Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

शीला मोती बहु उद्देशीय संस्था

February 26, 2014

Search by Tags:  Charity
मी चारुदत्त मोतीराम आहिरे वरील संस्थेचा अध्यक्ष असून माझ्या संस्थेतर्फे सामाजिक ,शैक्षणिक ,आरोग्य तसेच युवा रोझगार आदींसाठी विविध उपक्रम राबविले जातात . प्रत्येक महिन्यात विनामूल्य रोगनिदान व उपचार शिबीर आयोजित केले जातात तसेच या शिबिरात काही दुर्धर आजार आढळल्यास त्यांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शन व मदत केली जाते . अनाथ मुलांना शैक्षणिक साहित्य ,खाऊ वाटप ,गणवेश वाटप करून त्यांचे पुनर्वसन व सर्वतोपरी विकास व्हावा यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू . आर्थिक दृष्ट्या मागास तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांतील गुणवंतांचा सत्कार करणे व त्यांना भविष्यासाठी मार्गदर्शन करणे आदी उपक्रम राबविले जातात . सेवा सुविधा केंद्राद्वारे बचत गटांना मार्गदर्शन ,सुशिक्षित बेरोजगारांसाठी शासकीय योजनांची माहिती ,फेरीवाल्यांसाठी कार्ड वाटप ,प्रकल्प अहवाल ,नवीन संस्था नोंदणी , इ . कामे केली जातात . भविष्यात अल्प दरात वैद्यकीय उपचार होतील असे हॉस्पिटल सुरु करणे , समाजातील सर्व सुशिक्षित बेरोजगार युवकांना स्वताच्य पायावर उभे करणे ,सर्व प्रकारचे टेक्निकल शिक्षण मिळेल असे संकुल उभारणे ,स्वदेशीचा प्रचार प्रसार करणेसाठी स्वदेशी भांडार ,गोशाला ,सेंद्रिय शेती एकाच ठिकाणी सुरु करणे इ. मानस आहे .याकरिता आपण सर्वांच्या सहकार्याची व आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. मो. ९४२३४७९६०४ ,९७६५१२८२८९ शीला मोती बहु उद्देशीय संस्था ,शिवम हॉस्पिटल टिळक रोड, लासलगाव तालुका -निफाड ,जिल्हा -नासिक ,महाराष्ट्र
Search by Tags:  Charity
Top

Charudatta Ahire's Blog

Blog Stats
  • 12823 hits
Archives